लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे शुक्रवारी (दि. १०) नवबोद्ध वस्तीच्या दोन सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून कामाची सुरुवात करण्यात आली.
तालुक्यातील सालेगाव येथे नवबौद्ध वस्तीत दोन सिमेंट रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. या दोन रस्त्यांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.१०) करण्यात आले आहे. त्यानंतर कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद साळुंके, सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच हुसेन शेख, ग्रामपंचायत सदस्य मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, नितीन देशपांडे, शिलाबाई साळुंके, ग्रामविकास अधिकारी सहदेव मातोळे, शिपाई बबन बाबर, प्रवीण देशपांडे, सोसायटी चेअरमन मुरलीधर पाटील, गोपाळ माने, सचिन देशपांडे, विजयकुमार भालेराव आदींची उपस्थिती होती.











