लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील हणमंत ज्ञानेश्वर रसाळ यांची SSC CGL च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निवड परीक्षेतून सांख्यिकी अधिकारी वर्ग-२ मंत्रालय मुंबई या पदासाठी निवड झाल्याने त्यांचा लोहारा खुर्द ग्रामस्थांच्या वतीने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील बिरूदेव सुर्यवंशी, उपसरपंच सचिन बाळू रसाळ, मुख्याध्यापक श्री. साबळे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी महादेव पाटील, हनुमंत ज्ञानेश्वर सूर्यवंशी, शालेय समिती अध्यक्ष हनुमंत हरिबा रसाळ, सोसायटीचे माजी चेअरमन मुकुंद भैरव इंगळे, पठाण मॅडम, आवटे मॅडम, मा. तंटामुक्ती अध्यक्ष संजय महादेव रसाळ, योगेश पाटील, संदीप रसाळ, गोपाळ सूर्यवंशी, दत्ता मुरटे, पवन रसाळ, अजय रसाळ, ज्ञानेश्वर रसाळ, गणेश महादेव रसाळ, हनुमंत महाराज आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
