लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी विश्वेश्वर अमोल ओवांडकर हा बुद्धिबळ स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्यामुळे महाविद्यालयात त्याचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय धाराशिव व युवक व क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथे घेण्यात आल्या. विश्वेश्वर ओवांडकर याच्या या यशामुळे त्याची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्राचार्या उर्मिला पाटील यांनी विश्वेश्वर ओवांडकर याचा सत्कार करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सपना भोकरे, अंकिता सूर्यवंशी, प्राची गोरे, पायल कुंभार या विद्यार्थिनीची विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल

प्राचार्या उर्मिला पाटील यांनी सत्कार करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा विभागप्रमुख प्रा. प्रशांत काळे, क्रीडा विभागप्रमुख नागनाथ पांढरे, प्रा. ज्ञानदेव शिंदे, प्रा. विठ्ठल कुन्हाळे, प्रा. बालाजी सूर्यवंशी, प्रा. सचिन शिंदे, प्रा. सुनिल बहिरे, बालाजी इरूदे, भास्कर जाधव, दिलीप जाधव, प्रा. राजेंद्र साळुंके, प्रा. उद्धव सोमवंशी, प्रा. विद्यासागर गिरी, प्रा मुकुंद रसाळ, प्रा. नारायण आनंदगांवकर, काकासाहेब आनंदगावकर, अमोल ओवांडकर, प्रा. विष्णुदास कलमे, सुलोचना सूर्यवंशी, प्रा. विजय उंबरे, प्रा. राजेशा आष्टेकर, प्रा. रामचंद्र खुणे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.












