Vartadoot
Sunday, March 8, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध; कठोर कारवाईची निवेदनाद्वारे केली मागणी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
09/10/2025
in लोहारा तालुका
A A
0
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध; कठोर कारवाईची निवेदनाद्वारे केली मागणी
Ad 10

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या कृतीचा जाहीर निषेध करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोहारा तालुक्यातील संविधान प्रेमी नागरिकांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोहारा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना बुधवारी (दि.८) निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका मनुवादी प्रवृत्तीच्या वकिलाने बूट फेकून लोकशाही विरोधी अमानुष अशोभनीय कृत्य केले आहे. हे कृत्य भारतीय न्यायव्यवस्थेच्या सन्मानावर व घटनात्मक मूल्यावर झालेला अत्यंत घातक हल्ला आहे. या घटनेत सहभागी असलेला वकील स्वतःला सनातनी व मनुवादी विचारांचा अनुयायी म्हणवतो आणि बूट फेकताना त्याने दिलेल्या घोषणेमधून त्याचा जातीयवाद व वर्चस्ववाद हेतू स्पष्ट दिसून येतो. भूषण गवई हे भारतीय न्याय संस्थेतील उच्चतम पदावर कार्यरत असलेले दलित समाजातील अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या विरोधात केलेले हे कृत्य सामाजिक समता, न्याय आणि संविधानिक मूल्यांच्या विरोधात जाणारे आहे.


लोहारा तालुक्यातील लोकशाहीप्रेमी व संविधानप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून भारतीय संविधानाच्या आत्म्यावर आणि न्यायाच्या मूल्यांवरचा हल्ला आहे. म्हणूनच या प्रकरणातील संबंधित आरोपीवर तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच अशा प्रकारच्या असंविधानिक जातीवादी प्रवृत्तींना पाठिंबा देणाऱ्या घटकांचाही योग्य तपास करून तात्काळ अशा लोकांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर अमित सुरवसे, उत्तम भालेराव, अमीरहमजा खुट्टेपड, काकासाहेब भंडारे, दिगंबर कांबळे, पंकज सोनकांबळे, महेश गोरे, बालाजी यादव, इस्माईल शेख, बालाजी माटे, रावण कांबळे, प्रथमेश कांबळे, विद्यासागर कांबळे, किशोर भालेराव, राजेश मस्के, नोमान पठाण, मोजाब कुरेशी, शरद मस्के, सुमित कांबळे, अमोल सूर्यवंशी, कृष्णा सूर्यवंशी, हनुमंत कुंभार, गोंधळवाड दत्ता, लक्ष्मण रोडगे, विवेकानंद कांबळे, शंकर कांबळे, पटेल इब्राहिम, सचिन मस्के, नारायण कांबळे, गणेश कांबळे, ज्ञानेश्वर भालेराव, कलाप्पा दुपारगुडे, रोहित शिंदे, विकी शिंदे, राज भंडारे, अमोल गायकवाड, पुरुषोत्तम सीतापुरे, दगडू माटे, नितीन रोडगे, मोहन वाघमारे आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: भूषण गवईसरन्यायाधीश
Previous Post

बेलवाडी जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप

Next Post

सालेगाव येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Related Posts

नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
लोहारा तालुका

नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

04/03/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

01/03/2026
सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा
लोहारा तालुका

सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

26/02/2026
लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध

22/02/2026
दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता
लोहारा तालुका

दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता

18/02/2026
मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम
लोहारा तालुका

मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम

18/02/2026
Next Post
सालेगाव येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

सालेगाव येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's