लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथे बुधवारी (दि.८) समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी स्काऊट गाईड गणवेश पाहून मुले आनंदित झाली होती. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहू जाधव, मुख्याध्यापक राजेंद्र माळवदकर, शिक्षक राजकुमार क्षीरसागर, विकास घोडके, तानाजी पाटील, सोनाली जगताप, युवा प्रशिक्षणार्थी बबीता शिंदे, लक्ष्मण जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.














