लोहारा तालुक्यातील खेड येथील शिक्षक मोईजोद्दीन सौदागर यांनी शाळेसाठी प्रिंटर तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.
तालुक्यातील खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मोईजोद्दीन सौदागर यांनी शाळेसाठी जवळपास प्रिंटर तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले आहे. लोहारा गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार व विस्तार अधिकारी विश्वजित चंदनशिवे यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी दोघांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक काकासाहेब इंगळे, शिक्षक बळीराम आलमले, प्रवीण शिंदे, मोईजोद्दीन सौदागर, सुरेश साळुंके, राहुल भेडे, सुनंदा निर्मले, मल्लिकार्जुन कलशेट्टी, हिना शेख, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम आलमले यांनी तर मल्लिकार्जुन कलशेट्टी यांनी आभार मानले.













