लोहारा शहरातील आनायशा आसिफ खानापुरे या अवघ्या सात वर्षीय मुलीने रमजानमध्ये उपवास (रोजा) पूर्ण केला आहे.
लोहारा शहरातील आसिफ खानापुरे यांची सात वर्षांची मुलगी आनायशा हिने बुधवारी (दि.२५) तिचा पहिला उपवास (रोजा) पूर्ण केला आहे. याबद्दल तिच्या वडिलांनी सांगितले की, यापूर्वी आनायशाने कधी उपवास केला नव्हता. पण यावेळी ती स्वतः म्हणाली की, मीपण उपवास करणार आहे. त्यामुळे तिची इच्छा असल्याचे पाहून आम्ही तिला पाठिंबा दिला. रमजान महिन्यात रोजा करण्यास विशेष महत्त्व मानले जाते. आनायशा हिने दिवसभर उपवास करून सायंकाळी अजान झाल्यावर कुटुंबासोबत इफ्तार करून तिने हा रोजा पूर्ण केला. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.








