लोहारा तालुक्यातील भातागळी येथील जिल्हा परिषद प्रशाला व प्राथमिक शाळा भातागळी येथे आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत नवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून टिपरी व गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. यामध्ये ढोली डा, उदे ग अंबे उदे, चांदणं चांदणं, पापा मेरे पापा, तू ग दुर्गा अशा विविध गीतांवर विद्यार्थिनींनी टिपरी व गरबा नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून कौतुक केले व टाळ्यांच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा जट्टे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीता जगताप व जनाबाई कंदे यांनी प्रयत्न केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल कवाळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कोंडीबा कारभारी, शा.व्य.स. उपाध्यक्ष शिवराम जगताप, शिक्षक नंदकिशोर गायकवाड, बालाजी नाईक, मधुकर शिंदे, रसूल शेख, बालाजी माने, सूर्यकांत वैरागकर, राजेंद्र चौगुले, विशाल साळवे, मंगल इंगळे, नागनाथ काळे, पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.













