वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ( दि. १९) सकाळी देशाला संबोधित करताना तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. त्यामुळे नवीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी एक वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर यश आले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल लोहारा शहरातील शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष करण्यात आला.केंद्र सरकारने देशात नवीन तीन कृषी कायदे आणले होते. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी या कायद्यास विरोध दर्शविला. त्यानंतर हे नवीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी एक वर्षांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले होते. या शेतकरी आंदोलनाला अखेर यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ( दि. १९) सकाळी देशाला संबोधित करताना हे तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल लोहारा शहरातील शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष के. डी. पाटील, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, दिपक मुळे, संतोष फावडे, राहुल कोळी, ओम पाटील, रौफ बागवान, ईस्माईल मुल्ला, रफिक शेख, प्रकाश होंडराव, सचिन तोडकरी, सचिन माळी, गणेश तोडकरी, कपिल माशाळकर, बस्वराज पाटील, गोपाळ संदिकर, विकास नारायणकर, सिराज सिद्धकी, विशाल मिटकरी, अमित विरुधे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.