लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन २००-२००१ या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेत वर्गमित्रांच्या भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मठाधिपती शामचैतन्य महाराज होते. तत्कालीन शिक्षक चनबस कडले, विठ्ठल मुसांडे, तुकाराम उपासे, पांडुरंग ओवांडकर, दशरथ साठे, शाहूराजे जाधव, साखरे, अशोक साठे, किशोर पवार, लिपिक अशोक साठे, बालाजी पाटील, बाबुराव कांबळे, सुरेश सगर, गणेश तुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन सर्व उपस्थित गुरुजनांना सन्मानित करत विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त केले. यावेळी गुरुजनांसह शामचैतन्य महाराजांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र भोजनाचा आनंद घेतला. प्रशांत मडोळे यांनी सूत्रसंचालन केले. तब्बल पंचेविस वर्षानंतर वर्गमित्र एकत्र आल्याने जुन्या शालेय आठवणींना उजाळा मिळाला. अशाच प्रकारे पुन्हा एकदा एकत्र भेटण्याचे आश्वासन देत सर्वांनी निरोप घेतला.
या स्नेहमेळावा कार्यक्रमासाठी लक्ष्मण साठे, वैजनाथ पंढरपुरे, जितेंद्र अलमले, नागेश ढोले, गणेश पोटरे, गजेंद्र परतापुरे, विक्रम सगर, नितीन जाधव, हरी आळंगे, सुभाष कांबळे, तुकाराम मुसांडे, महादेव मुसांडे, अतुल निकम, बलभीम आलमले, सुनिता ओवांडकर, सविता धाडवे, लैला सय्यद, बालिका भोरे, ज्योती साठे, संध्या साठे, रेखा कांबळे, धनश्री वाघमारे, राधा मुळे, नागिनी औटे, स्वाती साठे, दैवशाला पाटील, सरस्वती गिरी, सारीक गिरी, ज्योती नरके आदींसह वर्गमित्रांनी पुढाकार घेतला.








