Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश देवकर तर उपाध्यक्षपदी रमेश कदम यांची निवड – शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा केला निर्धार

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील मार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश देवकर तर उपाध्यक्षपदी रमेश कदम यांची निवड करण्यात आली.
शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासामध्ये शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक आनंददायी व गुणवत्तापूर्ण व्हावे, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी शासनाच्या निकषाप्रमाणे समितीची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश देवकर व उपाध्यक्ष रमेश कदम यांचे उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही टाळ्यांच्या कडकडाटात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, माजी सरपंच अण्णासाहेब पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्डीचे मुख्याध्यापक सुरेश वाघमोडे, माजी अध्यक्ष नूर पठाण शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालक उपस्थित होते.

\"\"


नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश देवकर यांनी शाळेच्या विकासासाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्यात समन्वय ठेवून काम करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसोबतच शाळेच्या आवश्यक सुविधा, स्वच्छता, शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. शाळा ही गावाच्या भविष्याची पायाभरणी करणारी संस्था असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे हीच काळाची गरज आहे अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या निवडीमुळे शाळेच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली. शिक्षिका व्ही. के. चौधरी, एम. एल. चव्हाण, के. एस. माणिकशेट्टी, वाय. एस. बनकर, आर. डी. खटके यांनी निवड प्रक्रिया यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Previous Post

माकणी येथील भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Next Post

खत चोरी प्रकरणी कारवाई न झाल्याने नगरसेवक प्रशांत काळे यांचे उपोषण

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

खत चोरी प्रकरणी कारवाई न झाल्याने नगरसेवक प्रशांत काळे यांचे उपोषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!